breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सामुहीक विवाह सोहळ्यावर कोरोनाचे सावट; वधू-वरात अंतर, एकही नातेवाईक नको

पुणे |महाईन्यूज|

पुण्यात होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यात वधू-वरामध्ये तीन फूट अंतर ठेवावे. तसेच एकाही नातेवाईकांनी विवाहाला जाऊ नये, असा सल्ला पुण्याचे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी दिला.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला सुरवात झाल्यावर शासनाने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह साथ रोग नियंत्रण कायदा लागू केला. त्यामुळे शाळा, कॉलेज, जिम, स्विमिंग पूल, थिएटर, बागा अशी सर्व गर्दी होणारी ठिकाणी पुढील आदेशापर्यत बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. पण मार्च, एप्रिल हा लग्नाचा सिझन असल्याने अनेकांचे लग्नाचे मुहूर्त काढून झालेत.

‘यंदा कर्तव्य’ असं म्हणत बोहल्यावर चढण्याची तयारी केलेल्या लग्नांळूच्या आनंदावर आता कोरोना व्हायरसने विरजण टाकलं आहे. वाजंत्री गलबला करण्यासाठीही तयार झाली आहे. पण कोरोनाचा धोका टाळण्यासाठी गर्दी न करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत. अन एवढी सगळी तयारी झाल्यावर लग्न सोहळा रद्द करायला सांगणे, किंवा तारीख पुढं ढकलायला सांगणं म्हणजे तस अवघड काम आहे. यावर तोडगा म्हणून विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी वधू वरांमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवायला सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button