breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आत्महत्यापासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी पुणे पोलिसांचे “सायक्लोथॉन”

– पुणेकरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

पुणे | प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि  गेल्या  चार महिन्यापासून सुरू असलेली लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती यामुळे नैराश्याच्या गर्तेत जाऊन अनेक नागरिक आपले जीवन संपवत आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या अनेकांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात कुणी आणि परिसरामध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून नागरिकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.

यानिमित्ताने पुणे शहर पोलीस दलाकडून सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अनेक अधिकारी, पोलिस कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले. पोलीस उपायुक्त परिमंडळ तीनच्या पुढाकाराने ही जनजागृती करण्यात आली.
‘नो टू सुसाईड’, होऊ नका नाही नैराश्याचे  शिकार; पोलीस देतील तुम्हाला आधार…! अशा आशयाचे फलक घेऊन पोलिसांनी जनजागृती केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button