breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पीडितेची आई म्हणाली – शेवटच्या वेळी मुलीचे तोंडसुद्धा दाखवले नाही

हाथरस | हाथरस गँगरेप पीडितेवर अंत्यसंस्कार केल्याच्या 3 दिवसांनंतर पोलिसांनी मीडियाला पीडितेच्या गावात (बुलगढी) प्रवेश दिला आहे. पीडित कुटुंबाने मीडियाशी बोलताना पोलिस आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. मुलीची आई म्हणाली, “अखेरच्या क्षणी देखील मुलीचे तोंडसुद्धा पाहू दिले नाही, कोणाचे प्रेत जाळले आणि कोणाची अस्थी आणली हे देखील आम्हाला माहीत नाही.”

‘डीएमची नार्को टेस्ट करायला हवी’

पीडितेची वहिनी म्हणाली की, पोलिसांनी आम्हाला मारहाण केली. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी. आमची नार्को टेस्ट करणार असल्याचे बोलले जात आहे, मात्र डीएमची नार्को टेस्ट करायला हवी. आम्ही तर खरे बोलत आहोत. दुसरीकडे पीडितेच्या भावाने सांगितले की, पोलिस बुधवारी रात्री दहा वाजेपर्यंत घरात थांबले. यावेळी कोणालाही कोठेही जाऊ दिले नाही. तपासणी योग्य प्रकारे व्हावी अशी आमची इच्छा आहे.

सध्या फक्त मीडियाला एंट्री, नेत्यांना नाही

हाथरस सदरचे एसडीएम प्रेम प्रकाश मीणा म्हणाले की, सध्या फक्त मीडियाला गावात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित लोकांच्या परवानगीचे आदेश येताच सर्वांना सांगितले जाईल. दरम्यान पीडित कुटुंबातील सदस्यांचे फोन घेण्यात आले आहेत आणि त्यांना घरात कैदेत ठेवल्या आरोप चुकीचा असल्याचे देखील प्रेम प्रकाश यांनी सांगितले.

हाथरसच्या एसपीसह 5 पोलिस निलंबित

हाथरस प्रकरणात पोलिस-प्रशासनाच्या वृत्तीचा निषेध म्हणून देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान योगी सरकारने पोलिसांवर कारवाई केली. शुक्रवारी सरकारने हाथरसचे एसपी विक्रांत वीर यांच्यासह 5 पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button