breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जात,धर्म वेगळे असले तरी सर्वांची संस्कृती एकच; महंमद अफजल यांचे मत

  • कासारवाडीत इफ्तार पार्टी उत्साहात
  • भाजपच्या आमदारांसह पदाधिका-यांची उपस्थिती 

पिंपरी – देशाच्या कानाकोपऱ्यात राहणारे मुसलमान बांधव हे विदेशातील नाहीत. ते याच देशाचे नागरिक आहेत. या देशात वेगवेगळ्या जाती-धर्माचे नागरिक राहतात. परंतु, आपल्या देशाची संस्कृती एकच आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचा जात आणि धर्म वेगवेगळा असला,तरी आपल्या सर्व जाती-धर्मांची संस्कृती एकच आहे. त्यामुळे देशातील मुस्लिम बांधवांनी सर्वांसोबत मिळून मिसळून राहावे, असे आवाहन मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संयोजक महंमद अफजल यांनी केले.

पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम राष्ट्रीय मंच आणि जिजाई प्रतिष्ठान यांच्या वतीने शहरातील मुस्लिम बांधवांसाठी कासारवाडी येथे आयोजित इफ्तार पार्टीत ते बोलत होते. यावेळी मंचचे सहसंयोजक इरफान पिरजादे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, भाजपचे ज्येष्ठनेते आझम पानसरे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, जिजाई प्रतिष्ठानच्या संस्थापिका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेविका आशा धायगुडे -शेंडगे, हिराबाई घुले, अनुराधा गोरखे, चंदा लोखंडे, शर्मिला बाबर, नगरसेवक हर्षल ढोरे, नामदेव ढाके, शीतल शिंदे, केशव घोळवे, सागर आंगोळकर, कुंदन गायकवाड, राजेंद्र गावडे, भाजपच्याप्रदेश सदस्या उमा खापरे, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शैला मोळक, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, भाजपचे शहरसरचिटणीस सारंग कामतेकर, प्रमोद निसळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य संतोष ढोरे, शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, संजय शेंडगे, अजिज शेख, नसीर शेख, सादिक शेख आदी उपस्थित होते.

महंमद अफजल म्हणाले की, मुस्लिम धर्मामध्ये रमजानचा महिना पवित्र मानला जातो. त्यामुळे केंद्र सरकारने या पवित्र महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये जवानांकडून गोळीबार न करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीही करण्यात आली. परंतु, शत्रूराष्ट्र पाकिस्तानला या पवित्र महिन्याचा अर्थ कळला नाही. सीमेपलीकडून गोळीबार सुरूच ठेवला. नोटाबंदीमुळे जम्मू-काश्मीरमध्ये थोडी शांतता नांदू लागले आहे. नोटा बंदीनंतर याठिकाणी जवानांवर होणारे दगडफेकीचे प्रकार बंद झाले आहेत. जवानांवर होणारी दगडफेक ही पाकिस्तान पुरस्कृत होती. दगडफेक करणाऱ्यांना दिवसाला ५०० रुपये दिले जात होते. नोटाबंदीनंतर पैसे मिळणे बंद झाल्यामुळे दगडफेकीचे प्रकारही बंद झाले आहेत.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप तसेच आमदार महेश लांडगे यांनी मुस्लिम समाज बांधवांना पवित्र रमजानच्या शुभेच्छा दिल्या. समाजात सुख, समाधान आणि शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. समाजात एकोपा अबाधित राहावा, यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याची आवश्यकता असल्याचे मत जिजाई प्रतिष्ठानच्या संस्थापिका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी व्यक्त केले.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button