breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

दुदैवी! पती-पत्नीवर वाघाचा हल्ला; पत्नीचा मृतदेह मिळाला, पती बेपत्ता

चंद्रपूर : तेंदुपत्ता संकलनासाठी गेलेल्या पती-पत्नीवर वाघाने केलेल्या हल्ल्यात पत्नी ठार झाली असून पती बेपत्ता आहे. पतीला वाघाने उचलून नेले असावे असा अंदाज बांधण्यात येत आहे. ही दुदैवी घटना जिल्ह्यातील चिमुर तालुक्यात येणाऱ्या केवाडा येथे घडली. मीना जांभुळकर असे मृतक महीलेचे नाव आहे. तर पती विकास जांभुळकर हा बेपत्ता आहे. (tiger attacks on husband and wife in chandrapur)

चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-मानव संघर्षाने टोक गाठले आहे. अलिकडील काळात वन्यजीवांचे हल्ले वाढले आहेत. त्यात तेंदुपत्ता संकलन सुरू असून मजूर मोठ्या प्रमाणावर तेंदुची पाने तोडायला जंगलात जात आहेत. तेंदु हंगामादरम्यान वाघाच्या हल्याच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात येणाऱ्या केवाडा येथिल विकास जाभुळकर आणि त्यांचा पत्नी मिना जाभुळकर तेंदु संकलनासाठी जंगलात गेले.तेंदु संकलन करीत असताना वाघाने हल्ला केला.या हल्यात मीनाबाई जांभुळकर यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. तर विकास जांभुळकर हा बेपत्ता आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनविभाग बेपत्ता पतीचा शोध घेत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button