breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

नरेंद्र मोदी औरंगजेबाचा अवतार – संजय निरूपम

वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इशा-यानंतर बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी पैसै आकारण्यात येत आहे. औरंगजेब काशीच्या गल्लीबोळात अत्याचार करण्यासाठी उतरला होता. हिंदूची मंदिरे तोडली जात होती तेव्हा हिंदू लोकांनी विरोध केला होता. जे काम औरंगजेब करु शकला नाही ते काम नरेंद्र मोदी करत आहेत. नरेंद्र मोदी औरंगजेबाचे आधुनिक अवतार आहेत अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी केली आहे.

वाराणसी येथे एका कार्यक्रमात बोलताना निरुपम यांनी मोदींवर टीका केली. यावेळी निरुपम म्हणाले की, बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी ५५० रुपयांचा कर आकारला जातो. हिंदू रक्षण करण्याचा दावा करणारे मोदी काशीमध्ये मंदिरे तोडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अहंकार आहे. काशीची संस्कृती हिंदू लोकांनी औरंगजेबापासून वाचवली होती. आज औरंगजेबाचे काम नरेंद्र मोदी करत आहे अशीही टीका निरुपम यांनी केली.

मनमोहन सिंग सरकारमध्येही सर्जिकल स्ट्राईक झाले होते. काँग्रेसच्या शासनकाळातही सैन्य पाकिस्तानात घुसले होते. मोदी सरकार याचे राजकारण करत आहेत असा आरोपही निरुपम यांनी केला आहे. देशाचे संरक्षणमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि रेल्वेमंत्री निवडणूक लढवत नाहीत. त्यांच्याजागी सनी देओल, साध्वी प्रज्ञा ठाकूर, मनोज तिवारी अशांना भाजपाकडून निवडणूक लढवावी लागत आहे. जर देशात मोदींची लाट असती तर निर्मला सितारामन, सुषमा स्वराज, पियुष गोयल यांनी निवडणूक लढवली असती असा टोला निरुपम यांनी भाजपाला लगावला आहे

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button