breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

उत्तर प्रदेश पुन्हा बलात्काराने हादरलं, मेरठमध्ये आठ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

लखनौ | उत्तर प्रदेशमधल्या हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेतून देश अद्याप सावरलेला नाही, तोच उत्तर प्रदेशमधून आणखी एक बलात्काराची घटना समोर आली आहे. अशा घटना दररोज समोर येत आहेत. मेरठमधील एका आठ वर्षीय चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय मुलाने बलात्कार केला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर मुलगी तिच्या घराजवळच्या परिसरात खेळत असताना अल्पवयीन आरोपीने मुलीला स्वतःच्या घरी नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

अल्पवयीन आरोपी मुलीला घराच्या छतावर घेऊन गेला. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करुन तो तिथून पळून गेला. दरम्यान आजू-बाजूला राहणाऱ्या लोकांनी मुलीचा आवाज ऐकून आरोपीच्या घराकडे धाव घेतली. परंतु तोवर उशीर झाला होता. पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी गंभीर अवस्थेत असताना तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच पीडितेची मेडिकल चाचणी केली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button