breaking-newsताज्या घडामोडीलेख

पावसाळ्यात कपडे झटपट सुकवायचे असतील तर, पहा या काही खास टिप्स…

मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस पडायला सुरवात झाली आहे. पावसाळा सुरु झाला की सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे पावसाळयात कपडे कसे सुकणार याचा… पावसाळ्यात कधीतरी उन पडतं मात्र तेवढ्या वेळात कपडे सुकतीलच याची काही शाश्वती नसते.आणि घरात कपडे वाळत घातले तर त्यामुळे घरात असलेल्या दमट वातावरनात कपडे नीटसे सुकत नाही…आमि कपड्यांना आंबट वासही येतो…त्यामुळे कपडे झटपट सुकण्यासाठी आणि घरात वातावरण फ्रेश राहण्यासाठी काय करता येईल हे पाहुया…

  • मुख्य म्हणजे कपडे योग्य पद्धतीने पिळून घ्यावेत. मशीन वापरात असाल तर उत्तम.
  • कपडे थंड पाण्याने धुण्याऐवजी किंचित कोमट किंवा गरम पाण्याने धुवावेत. अगदीच शक्य नसल्यास कपडे धुवून झाल्यावर गरम पाण्यातून काढावेत.
  • कपडे वाळत घालताना त्यामध्ये पुरेसे अंतर ठेवा.
  • शक्यतो शर्ट किंवा टीशर्ट वाळत घालण्यासाठी हँगरचा वापर करा.

घरात कपडे वाळत घालत असाल तर त्याभोवती एक अगरबत्ती पेटवून ठेवा. ती अगरबत्ती कपड्यांपासून ठराविक अंतरावर ठेवा…अगरबत्तीच्या सुगंधामुळे यामुळे कपड्यांना कुजट वास येणार नाही.

  • कपडे 90 टक्के सुकल्यावर घडी करून ठेवण्याआधी इस्त्री करू शकता. पण अगदी ओल्या कपड्यांना इस्त्री करू नका यामुळे शॉक लागू शकतो. आणि कपड्यांना वासही येण्याची शक्यता असते…
  • कपड्यांना पावसाळ्यात येणारा दुर्गंध घालवण्यासाठी कपडे धुताना त्या पाण्यात थोडं व्हिनेगर घाला. किंवा जास्त वेळ भिजत न ठेवता एक 15 मिनिटे भिजत घालून कपडे धुण्यासाठी तुम्ही घेऊ शकता …

ज्या खोलीत कपडे वाळायला घातले असतील तिथे एका पिशवीत मीठ भरून ठेवा. कपड्यातील ओलावा मीठ शोषून घेतं.

पावसाळ्यात कपड्यांची निवड करताना सिल्क किंवा नायलॉन ला प्राधान्य द्या, हे फॅब्रिक चटकन सूकते. कॉटनचे कपडे घालणे शक्यतो टाळा. पावसाळ्याच्या आधी अंतर्वस्त्र थोडी अधिक प्रमाणात खरेदी करून ठेवा, अगदी किंचित ओले कपडे घातल्य़ाने त्वचेसंबंधी आजार होऊ शकतात…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button