breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पाकिस्तानातून आलेले हेरगिरी करणारे कबुतर बंदिस्त

पाकिस्तानमध्ये हेरगिरीचे प्रशिक्षण देण्यात आल्याचा संशय असलेले एक कबुतर जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्य़ातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पकडण्यात आल्याचे सोमवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

सांकेतिक भाषेतील संदेश घेऊन आलेले हे कबुतर पाकिस्तानमधून भारतीय हद्दीत येताच हिरानगर परिसरातील मनयारी गावातील नागरिकांनी त्याला पकडले. संबंधित यंत्रणेचे अधिकारी या सांकेतिक संदेशाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

ग्रामस्थांनी हे कबुतर पोलिसांच्या हवाली केले. कबुतराच्या एका पायाला एक वर्तुळाकार घटक बांधण्यात आला होता आणि त्यावर काही क्रमांक नमूद करण्यात आले होते. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button