breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

सुशांत सिंह राजपूत बद्दल बरच काही…

स्वतःच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये आपलं वेगळ स्थान मिळवलेल्या हरहुन्नरी कलाकार सुशांतसिंग राजपूतनं अचानक एक्झीट घेतल्यानं जवळ जवळ सर्वांनाच धक्का बसला.. काल म्हणजे 14 जूनला मुंबई मध्ये वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी सुशांतने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. अवघ्या 34 व्या वर्षी सुशांतसिंग राजपूतने जीवन संपावण्याच्या घेतलेला हा टोकाचा निर्णय अनेकांसाठी पचवण कठीण आहे. दरम्यान काही मीडिया रिपोर्ट्सनुसार तो नैराश्यामध्ये होता आणि त्याच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र काल दुपारी अचानक त्याने आत्महत्या केल्याचं समोर आल्यानं त्याच्या कुटुंबीयांवर मोठा आघात आहे. आज सुशांतसिंग राजपूत याच्यावर मुंबईमध्येच दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार होणार आहेत.

सुशांत सिंह राजपूत याच्या खाजगी आयुष्यातल्या काही खास गोष्टी.

सुशांतसिंह हा मूळचा बिहार येथील पाटण्याचा होता. त्याचे वडील, चुलत भावंडं तेथेच राहत होते. सुशांतसिंग राजपूत याची ओळख ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेपासून झाली. त्यानंतर तो ‘ काय पो छे’, ‘पीके’, ‘महेंद्रसिंग धोनी – अनटोल्ड स्टोरी’ अशा दर्जेदार सिनेमांमध्ये झळकला होता. छिछोरे या त्याच्या शेवटच्या सिनेमामध्ये त्याने आत्महत्याग्रस्त मुलाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. तर ‘ दिल बेचारा’ या सिनेमामध्ये सुशांत शेवटचा रूपेरी पडद्यावर दिसणार आहे.

सुशांतसिंग राजपूत सारख्या कलाकाराच्या अकाली एक्झिटने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अभिनेता अक्षय कुमार, माधुरी दीक्षित, करिना कपूर, करण जोहर यांच्यापासुन अगदी किरण मोरे, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गजांनी सुशांतला श्रद्धांजली अर्पण करत हळहळ व्यक्त केली आहे.

सुशांतच्या निधनाच्या बातमीचा त्याच्या कुटुबियांना जबर धक्का बसला आहे.यातून सावरन त्यांच्यासाठी नक्कीच सहज शक्य नाही… दरम्यान काल रात्री सुशांतचे वडिल आणि इतर कुटुंबिय मुंबईत दाखल झाले आहेत. पोलिसांनी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरातून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर कूपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टम झाले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल येईल आणि मृतदेह कुटुंबांच्या ताब्यात दिला जाईल…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button