breaking-newsमुंबई

शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

 मुंबई : शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळाली आहे. ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या, ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

राज्यात जुलैपासून प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यायी शिक्षण विभागाने तयारी दर्शवली होती. शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाली आहे.

राज्यात जुलै पासून टप्प्याटप्प्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याची तयारी

शाळा सुरू करण्यापूर्वी एक महिना सदर गावात कोरोनाच्या एकही रुग्ण नसेल याची खात्री करून शाळा सुरू होणार

सरसकट शाळा सुरू होणार नाहीत

जिथे महिनाभरात एकही रुग्ण आढळला नाही तिथले नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग जुलैपासून सुरू करण्याची तयारी

सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्टपासून सुरू करण्याची तयारी

पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरू करण्याची तयारी

अकरावीचे वर्ग दहावीचा निकाल लागल्यानंतर आधी प्रवेश प्रक्रिया होणार
ती पूर्ण झाल्यावर वर्ग सुरू करण्याची तयारी

विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी एक दिवस आड वर्ग भरवण्याचीही मुभा

शाळा सुरू करण्यापूर्वी त्यांनी सॅनिटायझेशन करणे बंधनकारक

प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसवण्याची अट

शिक्षक, विद्यार्थ्यांना मास्क घालणं बंधनकारक

हे वेळापत्रक संभाव्य स्वरूपाचे असून स्थानिक परिस्थिती विचारत घेऊन त्याप्रमाणे शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button