breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंतप्रधानांच्या सोशल मीडियातू ‘Exit’ घेण्यामागचं सत्य उलगडलं

नवी दिल्ली |महाईन्यूज|

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री आपण सोशल मीडिया सोडण्याचं सूतोवाच सोशल मीडिया अकाऊंटद्वारेच केलं… ‘रविवारपासून सोशल मीडियातू एक्झिट घेण्याचा विचार करतोय’, असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं होतं. यामुळे त्यांच्या चाहत्यांचा एकच गोंधळ उडाला. परंतु, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या सोशल मीडिया संन्यासामागचं सत्य जाहीर केलंय.

येत्या रविवारी अर्थात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्तानं पंतप्रधानांनी सोशल मीडियाद्वारे एक नवीन उपक्रम जाहीर केलाय. आपल्या आयुष्याला प्रेरणा देणाऱ्या महिलांचा गौरव यानिमित्तानं केला जाणार आहे.या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी नागरिकांना केलंय. यामुळे एका दिवसासाठी पंतप्रधानांचं सोशल मीडिया अकाऊंट हाताळण्याची संधी महिलांना नक्कीच मिळू शकते …

यासाठी, जगाला प्रेरणा देणाऱ्या महिला किंवा तुमच्या आयुष्यात प्रेरणेचं स्थान राहिलेल्या महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करायचा आहे. सोबतच #SheInspiresUs हा हॅशटॅगही जोडायचा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button