breaking-newsपुणेमहाराष्ट्र

‘जिसको चाहिए पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान’, ओवैसींच्या सभेतील त्या मुलीचे होर्डिंग झळकले पुण्यात

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुसलमीन अर्थात AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या CAA-NRC विरोधातील आयोजित सभेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. पुण्यात त्याची आठवण करून देण्यात आली आहे. अमुल्या नावाच्या एका तरुणीने थेट व्यासपीठावरून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यावर तिचा घोषणा देतानाच्या फोटोसह ‘जिसको चाहिए पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान’ असा मजकूर असलेलं होर्डिंग पुण्यात लावण्यात आलं आहे.

घोषणा देणा-या अमूल्याला पोलिसांनी अटक केली होती. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल झाला आहे. अटकेनंतर तिला कोर्टात हजर केलं गेलं. कोर्टाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पण, याची आठवण करून देत पुण्याच्या एसपी महाविद्यालयाच्या चौकात मुलीच्या फोटोसह होर्डिंग लावण्यात आलं आहे.

होर्डिंगवर अमूल्याचा घोषणा देतानाच्या फोटोसह ‘जिसको चाहिए पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान’ असं लिहिलेलं आहे. पुण्यातील एसपी महाविद्यालयाच्या चौकात हे होर्डिंग लावलं आहे. निखिल पवार यांनी हे होर्डिंग ट्विट केलं. त्यानंतर या होर्डिंगची चर्चा रंगली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button