breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

Allegation : देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

मुंबई | महाईन्यूज

सर्वोच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. यामुळे फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा फडणवीस यांच्यावर आरोप आहे.

विधानसभेच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप आहे. यापूर्वी नागपूर न्यायालयाने फडणवीसांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. नागपुरातील 2 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा फडणवीसांवर आरोप आहे. यातील एक मानहानीचा खटला आणि दुसरा फसवणुकीचा खटला आहे. यापूर्वी सत्र न्यायालयाने याबाबत फडणवीसांना समन्स बजावला होता.

फडणवीसांची बाजू

दोन खासगी तक्रारी माझ्याविरुद्ध करण्यात आल्या होत्या. यात माझ्यावर वैयक्तिक आरोप नाहीत. या सगळ्या आंदोलनाच्या केसेस आहेत. एक केस 1995-98 ची आहे. सर्व केसेस या लोकांच्या संघर्षासाठी आहेत. मी कोर्टात माझी बाजू मांडली आहे. मला कोर्टाकडून न्याय मिळेल. या सगळ्यामागे कोण आहे हे चांगलंच माहित आहे. झोपडपट्टी हटाव मोहिमे विरुद्ध आंदोलन करताना हे गुन्हे लावण्यात आले होते. निवडणुकीच्या काळात इतर सर्व गुन्ह्यांची माहिती दिली होती. फक्त वकिलांच्या सांगण्यावरून ही माहिती दिली नव्हती. त्यात लपविण्यासारखं काहीही नाही. कोर्टात सगळं सिद्ध होईल असंही ते म्हणाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button