breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

फडणवीसांनी चमत्कार केला, अन… त्यांना माणसं आपलीशी करण्यात यश : शरद पवार

पुणे : “अपक्षांना आपल्या बाजूने वळविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला आहे. अपक्ष आमदार आपलीशी करण्यात विरोधी फडणवीस यांना यश आलं. राज्यसभा निकालाने मला कोणताही धक्का बसलेला नाही”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. “महाविकास आघाडीच्या एकूण संख्येप्रमाणे मतदान झालं. तिन्ही पक्षातील एक मतंही फुटलं नाही. जी मतं फुटली आहेत ती अपक्षांची आहेत”, असं पवार म्हणाले.

महाविकास आघाडीकडे विजयाचं आवश्यक संख्याबळ असूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडीला धूळ चारुन तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणले. ऐन निवडणूक काळात फडणवीसांना कोरोनाची बाधा झाली होती. पण त्यांनी शांततेच्या काळात अधिकचा घाम गाळला, त्याचं फळ भाजपला तिसऱ्या जागेच्या विजयी रुपात मिळालं. फडणवीसांनी मविआला चितपट केल्यानंतर शरद पवार यांच्या प्रतिक्रियेकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अखेर पवारांनी राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.

निकालाने मला धक्का बसला नाही

“राज्यसभा निवडणूक निकालानंतर मला स्वत:ला फार धक्का बसलेला नाही. तुम्ही जर मतांची संख्या बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचा उमेदवारांचा जो कोटा दिला, त्यामध्ये काहीही फरक पडलेला नाहीये. फक्त एक मत प्रफुल्ल पटेल यांना जादा पडलं आहे आणि ते मत कुठून आलंय हे मला ठाऊक आहे. ते या आघाडीचं नाही ते दुसऱ्या बाजूचं आहे”, असा गौप्यस्फोटही शरद पवार यांनी केला.

देवेंद्र फडणवीसांना चमत्कार केला, त्यांना माणसं आपलीशी करण्यात यश

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, “आता सहावी जागा जी शिवसेनेने लढवली तिथे आमची गॅप पडत होती. मतांची संख्या कमी होती. पण, धाडस केलं आणि प्रयत्न केला, त्या प्रयत्नात अपक्षांची संख्या ही भाजपकडे अधिक होती आणि आमच्याकडे कमी होती. तरीही दोघांना पुरेशी नव्हती आणि त्यामुळे भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपक्ष होते त्यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी काही यशस्वी कारवाई केली त्यात फडणवीसांना यश आलं. चमत्कार झाला हे मान्य केलं पाहिजे. त्यामुळे हा फरक पडला. नाहीतर ही जी आघाडी आहे त्या आघाडीच्या एकंदर संख्येप्रमाणे त्यांना मतदान झालेलं आहे. त्यात वेगळं काही नाही”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button