breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न, सातत्य गरजेचे’; सदानंद इनामदार

सोहम सार्वजनिक ग्रंथालयातील स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पिंपरी : सोहम ग्रंथालयातील स्पर्धा परिक्षेत अभ्यास करून शेकडो विद्यार्थी विविध शासकीय सेवे आपले योगदान देत आहेत. ही आनंददायी बाब आहे. विद्यार्थ्यांनी आपण एकदा निर्णय घेतल्यावर कोण काय म्हणेल याची पर्वा करू नये. अभ्यासात चिकाटी सोडू नये. प्रयत्न व सातत्य ठेवल्यास स्पर्धा परिक्षेत यश निश्‍चित मिळेल, असे प्रतिपादन सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक सदानंद इनामदार यांनी केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त सोहम सार्वजनिक ग्रंथालयात माजी पोलीस अधीक्षक सदानंद इनामदार यांच्या हस्ते ध्वजवंदन आणि स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून इनामदार बोलत होते.

हेही वाचा – ‘निष्ठेने कर्तव्ये निभवणाऱ्या स्त्रीला संविधानात महत्त्वाचे स्थान आहे’; कामगार नेते बाबा आढाव

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर, प्रदीप बोरसे, मायला खत्री, नंदू कदम, धनंजय कुलकर्णी, सुदाम तारक, दीनदयाळ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. वसावे आदीसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

वाचनाची आवड वाढावी म्हणून संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. नंदू कदम यांनी सर्वांना पंचप्रण शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव चौधरी यांनी केले. प्रदीप बोरसे यांनी आभार मानले. ग्रंथपाल वर्षा बोरसे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button