breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सफाई कामगार महिलांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरुपी घ्यावे – बाबा कांबळे

पिंपरी | महाईन्यूज

कोरोना काळात सर्वजण घरामध्ये असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सोळाशे साफ सफाई कामगार महिलांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता शहर स्वच्छ ठेवण्याचे काम केले आहे. कोरोना आपत्ती काळात सेवा दिल्याबद्दल कायम कामगारांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भरघोष आर्थिक मदत  दिली. परंतु, कंत्राटी पद्धतीने कामे करणाऱ्या साफसफाई कामगार  महिलांना मात्र दीड हजार रुपये मदत करण्याचे जाहीर केले आहे, ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे, किमान पाच हजार रुपये आर्थिक मदत करावी, अशी मागणी कष्टकरी कामगार पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली आहे.

कंत्राटी सफाई कर्मचा-यांना दिवाळीनिमित्त पगार एवढा बोनस देण्यात यावा, साफसफाई कामगार महिलांचा थकीत प्राेव्हिडेंट फंड तातडीने देण्यात यावा, समान काम समान दाम या पद्धतीने आणि सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे किमान वेतनाचा फरक मिळवून द्यावा, गेली अनेक वर्षांपासून साफसफाई कामगार महिला महापालिकेत कामे करत आहेत, त्यांचे सेवेतील योगदान लक्षात घेता त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, घरकुल योजनेत साफसफाई कामगार महिलांना प्रधान्य देण्यात यावे, आदी विविध मागण्यांसाठी कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने आज सोमवारी (दि. २६) सायंकाळी ४ वाजता आंदोलन करून पालिका प्रशासनाला निवेदन दिले.

अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कार्याध्यक्ष बळीराम काकडे, भीमा-कोरेगाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अनिता साळवे, प्रल्हाद कांबळे, सविता लोंढे, मंगल तायडे, मधुरा डांगे, कांताबाई कांबळे, आशा पठारे आदी सहभागी होते. यावेळी बाबा कांबळे म्हणले, पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेली वीस वर्षापासून आरोग्य विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने साफसफाई काम करणाऱ्या महिलांना नियमानुसार महापालिकेने कायम सेवेत घेतले पाहिजे. परंतु, तसे न करता गेल्या अनेक वर्षापासून कंत्राटी कामगारांची पिळवणूक केली जात आहे. त्यांना कायमस्वरूपी सेवेत घेतले जात नाही, यापूर्वी देण्यात आलेले ठेके आता संपत आले असून पुन्हा त्याच ठेकेदारांना आणि इतर ठेकेदारांसाठी पुन्हा निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, ही निविदा रद्द करून कर्मचाऱ्यांना कायम करावे, अशी मागणी बाबा कांबळे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button