breaking-newsराष्ट्रिय

पंतप्रधानांच्या पुतणीची पर्स चोरल्याप्रकरणी एकास अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी दमयंती बेन मोदी हिची पर्स चोरल्याच्या प्रकरणी हरयाणातील सोनीपत येथून २१ वर्षांच्या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.

दमयंती यांच्या बॅगेत ५६ हजार रुपये रोख व दोन मोबाइल फोन होते. शनिवारी सकाळी रिक्षातून उतरत असताना दोन व्यक्तींनी त्यांची पर्स हिसकावली.

दमयंती यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता व नंतर तपास सुरू केल्यानंतर सोनीपत येथील गौरव उर्फ नोनू याला अटक करण्यात आली. तो एका नातेवाइकांच्या घरी राहतो. गौरव हा दिल्लीतील सदर बझारचा रहिवासी असून काही वेळा तो नबी करीम भागातही राहतो. त्याच्या साथीदाराला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या साथीदाराचे नाव बादल असे असल्याचे पोलिस उपआयुक्त मोनिका भारद्वाज यांनी सांगितले. बादल हा सुलतानपुरीचा रहिवासी आहे. दोन जणांनी स्कूटरवरून येऊन दमयंती यांची पर्स हिसकावली होती. त्यात मोबाइल, कागदपत्रे, ५६ हजार रूपये रोख होते. उत्तर दिल्लीतील गुजराती समाज भवन या भागात त्या रिक्षातून उतरत असताना हा प्रकार झाला.  चोरी नंतर आरोपी गौरव हा त्याच्या मावशीच्या घरी गेला होता. तेथून त्याने गुन्ह्य़ात वापरलेली स्कूटर जप्त करण्यात आली.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणावरून दोन आरोपींची ओळख पटली आहे. त्यांनी हेल्मेट घातलेले नव्हते. जाबजबाबात गौरव याने पोलिसांना सांगितले, की ऑटोरिक्षात दमयंती बेन  यांना त्याने आधीच पाहिले होते. त्यानंतर त्यांची पर्स हिसकावली.

दमयंती बेन या पंतप्रधानांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कन्या आहेत. आरोपी गौरव याने अनेकदा मारामाऱ्या केल्या असून यापूर्वी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत का याचा  तपास  केला जात असल्याचे पोलिसांना सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button