breaking-newsराष्ट्रिय

दिल्लीतील हवेचा दर्जा अतिखराब

दिल्ली:- दिल्ली राजधानी परिसरातील हवेचा दर्जा रविवारी आणखी अति खराब झाला असून  हवा दर्जा निर्देशांक २४५ पर्यंत गेला आहे. त्यामुळे हवेचा दर्जा खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे. येथील काही भागात काजळीचा थर दिसून आला आहे.

हवा दर्जा निर्देशांक गाझियाबाद- ३२०, नॉइडा- ३१०, आनंदविहार ३२७, वझीरपूर  ३२३, विवेकविहार-३१७, मुंडका ३०९, बवाना ३०२, जहांगीरपुरी ३०० असे नोंदले गेले. दुपारनंतरच्या नोंदणीत हे आकडे वाढले आहेत.  हरयाणातील अलिपूर खालसा येथे हवा निर्देशांक ३५१, तर पानिपत येथे ३३९ झाला आहे. त्यामुळे तेथील हवा अत्यंत खराब गटात मोडणारी आहे, असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे.

पिकांचे अवशेष जाळण्याच्या प्रमाणात वाढ

पंजाबमध्ये भात काढणीचा हंगाम सुरू झाला असून ११ ऑक्टोबपर्यंत पिकांचे अवशेष जाळण्याच्या घटनात ४५ टक्के वाढ झाली आहे. या वर्षी सरकारने या प्रश्नात बराच हस्तक्षेप केल्याने पिकांचे अवशेष जाळण्याच्या घटना नंतर कमी होत जातील अशी आशा व्यक्त केली जात होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button