breaking-newsमुंबई
‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो’- राज ठाकरे
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो, असे म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन ट्वीट केले आहे. राज ठाकरे सध्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी ट्विटरवरुन आपले मत मांडले.