breaking-newsआंतरराष्टीय
इजिप्तमध्ये 19 दहशतवादी ठार
कैरो – इजिप्तमधील सिनाई प्रांतामध्ये गेल्या काही दिवसात सैन्याने केलेल्या कारवाईमध्ये 19 दहशतवादी ठार झाले आहेत. इजिप्तच्या लष्करी सूत्रांनी ही माहिती दिली. लष्कराची ही कारवाई “कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑपरेशन सिनाई 2018′ नावाच्या मोहिमेचा एक भाग होती. देशातील दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी यावर्षी फेब्रुवारीमध्ये उत्तर आणि मध्य सिनाई प्रांतामध्ये ही मोहिम सुरू करण्यात आली आहे.
उत्तर आणि मध्य सिनाईत सैन्याबरोबरच्या धुमश्चक्रीमध्ये 10 दहशतवादी मारले गेले, असे सैन्याने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले होते. मात्र नंतर यामध्ये आणखी 9 दहशतवादीही पोलिस आणि सुरक्षा रक्षकांकरवी मारले गेल्याचे म्हटले गेले. याच कारवाईदरम्यान अन्य 20 दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याचेही म्हटले आहे.