breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अहमदनगर मधील केडगावमध्ये बंदुकीचा धाक दाखवत दरोडा

अहमदनगर: नगर शहरासह जिल्ह्याचा चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. बुधवारी रात्री केडगाव येथे चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकलेला आहे. चार दरोडेखोरांनी रात्री घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करत पाच तोळे सोन्याचे दागिणे ओरबाडून नेले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडालेली असून केडगावमध्ये भितीचे वातावरण तयार झालेले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात रमाकांत महादेव पराळे (वय 55) यांनी फिर्याद दाखल केली आहे. सविस्तर असे की, बुधवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास चार दरोडेखोर पराळे यांच्या घरात घुसले होते.

यावेळी घराबाहेर झोपलेल्या पराळे यांच्या मेव्हण्यास बंदुकीचा धाक दाखवून दमदाटी केली . दुसर्‍या दरोडेखोरांनी पराळे यांना बंदुकीच्या मागील बाजूने डोक्यात व पोटात मारहाण करुन त्यांच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची चैन काढून घेतली. यावेळी आणखी एका दरोडेखोराने त्यांच्या पाठीला चाकू लावून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. व या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी घटनास्थळी जावून माहिती घेतली आहे. दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. जिल्ह्यात चोर्‍या, दरोडे वाढल्यामुळे पोलिस प्रशासन नेमके करते काय असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button