breaking-newsराष्ट्रिय

दाती महाराजाच्या आश्रमातून 600 मुली बेपत्ता?

दिल्ली पोलिसांकडून गुरुकूल आश्रमाची झडती ः लैंगिक अत्याचार केल्याचा सेविकेचा आरोप 
जयपूर – स्वयंभू बाबा दाती महाराज याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या गुरुकुल आश्रमातून 600 मुली बेपत्ता झाल्या आहेत. या आश्रमात आता केवळ 100 मुली आहेत. दरम्यान, दाती महाराज आणि त्याच्या लोकांकडून धोका असल्या कारणाने 600 मुली आपल्या घरी गेल्याचे सांगितले जात आहे. या बेपत्ता मुलींचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहेत.
एका सेविकेवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंभू बाबा दाती महाराज यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. दिल्ली पोलिसांची एक टीम त्याच्या राजस्थान येथील एका आश्रमावर दाखल झाले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या सेविकेवर बलात्कार झाला तिचीही दिल्ली पोलिसांनी भेट घेतली. दरम्यान, दाती महाराज पाली येथील आश्रमात सापडला नाही. मात्र, सेविकेने केल्या आरोपांची माहिती घेण्यासाठी या आश्रमाला भेट घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हा दाती महाराज म्हणजे पूर्वाश्रमीचा मदन लाल अगोदर चहा विकत होता. तो एका चहाच्या टपरीवर काम करत होता. कालांतराने त्याने स्वत:ला महाराज म्हणून संबोधण्यास सुरुवात केली. सामान्य मदन लाल हा काही वर्षात प्रसिद्ध शनिधाम आश्रमचा मालक झाला. मात्र, सेविकेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी त्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली. या स्वयंभू बाबाने राजस्थान आणि दिल्लीत अनेकवेळा आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप पीडित महिलेने केला. यामध्ये बाबाचे दोन सेवकांनी आपल्यावर अत्याचार केल्याचे या पीडित महिलेने आरोप केला.
लुकआऊट नोटीस जारी 
दिल्ली महिला आयोगाने याची गंभीर दखल घेत या दाती महाराजाला अटक करण्याची मागणी केली आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे हा बाबा देश सोडून बाहेर जाऊ शकणार नाही. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, एक तपापासून एक महिला शिष्या दाती महाराजाकडे होती. बलात्कार झाल्यानंतर ती राजस्थानात आपल्या घरी परतली आहे. दिल्ली गुन्हे पोलीस या बाबाविरोधात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button