breaking-newsआंतरराष्टीय

न्यूजर्सीमधील कला महोत्सवादरम्यान गोळीबार, चेंगराचेंगरी

  • संशयित ठार तर 17 जण जखमी 

त्रेन्टोन (अमेरिका) – न्यूजर्सी राज्यातील त्रेन्टोन येथे एका कलामहोत्सवादरम्यान गोळीबार झाल्यामुळे उपस्थितांमध्ये प्रचंड चेंगराचेंगरी झाली. यावेळी झालेल्या गोळीबारामध्ये एक संशयित ठार झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. हा कलामहोत्सव शनिवारी दुपारी झाला होता. गोळीबारामुळे 16 ते 20 जण जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. यामध्ये 13 वर्षाच्या एका मुलाचाही समावेश आहे, असे मर्सेर भागाचे सरकारी अधिकारी अँजेलो ओनोफ्री यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

स्थानिक कलाकारांसाठी आयोजित या कलामहोत्सवामध्ये संगीत, नृत्य आणि खाद्यपदार्थांची रेलचेल होती. या कलामहोत्सवाला सुमारे 1 हजार युवक युवती उपस्थित होते. या महोत्सवादरम्यान दोघा संशयितांनी गोळीबार करायला सुरुवात केली होती. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच धावपळ उडाली. त्या चेंगराचेंगरीमध्ये अनेकजण खाली पडले आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबार करण्याच्या संशयावरून पोलिसांनी एकाला हेरले. मात्र त्या
यादरम्यान झालेल्या गोळीबारात हा 33 वर्षांचा संशयित ठार झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button