breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

मलेशियात शाळेला आग; २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू

क्वालांलपूर : क्वालांलपूरमधील एका धार्मिक शाळेला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
दोन मजली इमारतीला लागलेल्या आगीत २३ विद्यार्थी आणि दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तहफीज दारूल कुराण इत्तिफकिया असे या शाळेचे नाव असून ती राजधानी क्वालांलपूरमध्ये आहे. शाळेला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एका तासानंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

मला वाटतेय गेल्या २० वर्षातील ही सर्वात मोठी आगीची घटना आहे. आगीमुळे धूर निघाल्याने श्वास कोंडून २५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती फायर अँड रेस्क्यू डिपार्टमेंटचे संचालक खिरुदीन द्रहमन यांनी ‘एएफपी’ला दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button