breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडीतील घरफोडीप्रकरणी मध्यप्रदेशातून तिघे ताब्यात

पिंपरी – फ्लॅटचे लॉक उचकटून सुमारे एक कोटीचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सुत्रधारासह तिघांना मध्यप्रदेशातील खांडवा रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले आहे. निगडीतील भक्ती-शक्ती चौकाजवळ घडलेला हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला होता. त्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.

गोविंद कालु परियार (वय 35, रा. कलाली, लमकी, देश – नेपाळ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या अन्य दोन साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. विनोद राजकुमार अगरवाल (वय 48, रा. सेक्टर नंबर 23, पंचवटी बांगला, भक्ती-शक्ती चौक, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद हा अगरवाल यांच्या बंगल्यामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत होता. अगरवाल कुटुंबीय दोन दिवसांपूर्वी घरगुती कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. शनिवारी (दि 16) रात्री घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत गोविंद याने विनोद यांचा तिस-या मजल्यावरील फ्लॅट आणि त्यांचा भाऊ संदीप अगरवाल यांचा दुस-या मजल्यावरील फ्लॅटचे लॅच तोडले. घरातील वॅाडरोब आणि बेडरूम मधील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, लॅपटॉप, डायमंड सेट व रोख रक्कम असा एकूण 97 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज घेऊन गोविंद पसार झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button