breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

कामगार हॉस्पिटल आग: मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात आली 10 लाखांची मदत

17 डिसेंबरला मुंबईतील अंधेरी या ठिकाणी असलेल्या कामगार रूग्णालयाला आग लागली. या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला. तर 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले. आगीतील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची आर्थिक मदत सोमवारी देण्यात आली. स्थानिक नगरसेवक मुरजी पटेल यांनी हे धनादेश मृतांच्या नातेवाईकांना दिले.

मुंबईतील अंधेरी भागात कामगार रूग्णालय आहे. या रूग्णालयाला 17 डिसेंबर ला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आग लागली. पोलिसांनी आगीप्रकरणी सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अभियंता आणि पर्यवेक्षकास मागील बुधवारी अटक केली. नीलेश मेहता आणि नितीन कांबळे अशी या आरोपींची नावे आहेत. रुग्णालयात बांधकाम करणाऱ्या आणि वीज उपकरणे बसवण्याचे कंत्राट असलेल्या सुप्रीम कंपनीच्या निष्काळजीमुळे आग लागल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button