breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

नीरव मोदीचा भाऊ ५० किलो सोनं घेऊन फरार

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटींचा घोटाळा करून परदेशात पळालेल्या नीरव मोदीचा सावत्र भाऊ नेहल हा दुबईतील एका सेफहाऊसमधून तब्बल ५० किलो सोनं घेऊन फरार झाला आहे. पीएनबी घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदीविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केल्याची माहीती मिळाल्यानंतर नेहलने ५० किलो सोने घेऊन पळ काढला आहे.

पीएनबी घोटाळ्याचा तपास करीत असलेली सीबीआय दुबईपर्यंत पोहोचू शकते, अशी भीती वाटल्याने नेहलने विक्रीसाठी ठेवलेलं सर्व सोनं घेऊन दुबईतून पळ काढल्याचं सूत्रांनी सांगितलं. नेहल हा मेहुल चोक्सीची कंपनी गीतांजली जेम्समध्ये कार्यरत होता. मुंबईतील विशेष कोर्टात गुरुवारी ईडीने २४ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले असून यात नेहलचाही समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button