breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#CoronaVirus : पिपंरी-चिंचवडमध्ये एक पॉझिटिव्ह तर 80 जणांचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविले

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आज मंगळवारी (दि. १७) एकुण ८० व्यक्तींचे करोना (कोविड १९) करीता घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणीकरीता पाठविण्यात आले आहेत. एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला असून उर्वरीत नऊ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.

पिंपरी-चिंचवड मनपामधील १७ मार्चअखेर एकुण १० करोनाबाधित रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांचेवर दोन्ही रुग्णालयांमधील आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. तसेच, अहवाल निगेटिव्ह आलेल्यांना घरी सोडले आहे. त्यांना घरात क्वॉरंन्टाईन खाली ठेवण्यात आले आहे. आजरोजी करोना पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण हा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथून आर्यलँड येथे राहून दुबई मार्गे शहरात आलेला आहे. त्याच्या सहवासितांची माहिती घेवून त्यांना घरातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

आजरोजी एकुण ०७ व्यक्तींचे करोना (कोविड १९) करीता घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणीकरीता पाठविण्यात आले आहेत. करोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड मनपामार्फत एकुण २४४ क्षेत्रीय सर्वेक्षण टिम नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. सदर टीममध्ये वैद्यकीय कर्मचारी, शिक्षण मंडळ कर्मचारी, मनपाचे आयटीआयमधील कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या असून त्यांचे मार्फत संपुर्ण मनपा कार्यक्षेत्रामध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

याकरीता आजरोजी टिममधील नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे घेण्यात आली होती. कार्यशाळेस आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अति.आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, डॉ. विजया आंबेडकर, डॉ. शैलजा भावसार, डॉ. संगिता तिरुमणी, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित माने, डॉ. राहुल राऊत आदी उपस्थित होते.

परदेशातून आलेल्या नागरिकांनो 14 दिवस घरातच थांबा

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील आयसीयु उपलब्ध असलेल्या सर्व खाजगी रुग्णालय व्यवस्थापकांची बैठक घेवून त्यांचेकडे उपलब्ध असलेली बेड संख्या, व्हेटींलेटर इत्यादी उपकरणे यांची माहिती घेतली. करोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. फ्लुसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया व युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशांमधुन आलेल्या सर्व नागरिकांनी किमान १४ दिवस घरांमध्येच (Home Quarantine) राहणेकरीता पिंपरी-चिंचवड मनपाचे वतीने पुनश्च: आवाहन करण्यात येत आहे.

ही आहे महापालिकेची हेल्पलाईन

महापालिकेतर्फे हेल्प लाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६ हा आहे. राज्य शासनामार्फत कार्यान्वित idsp.mkcl.org या संकेतस्थळावर संशयित करोना रुग्ण संबंधित माहिती देण्याचे आवाहन नागरीक तथा सर्व वैद्यकीय व्यावसायिक यांना करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button