breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#PCMCCOVID-19 : आज एका महिलेचा मृत्यू तर नवीन तीन रुग्णांची नोंद

पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणुमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आज नव्याने तीन रुग्णांची भर पडली आहे. आता शहरातील एकूण रुग्णांची संख्या ६७ झाली आहे. आजपर्यंत या विषाणुमुळे तीन रुग्ण दगावले आहे. पैकी आज एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. आज चाचणी अहवाल सकारात्मक ( पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण हे दापोडी, वाकड व मार्केट यार्ड गुलटेकडी पुणे या परिसरातील आहेत. आज मृत झालेली महिला ही मार्केट यार्ड गुलटेकडी पुणे येथे राहणारी होती. ती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कोवीड – १९ आजाराच्या उपचाराकरिता दाखल असताना तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

थेरगांव आणि खराळवाडी येथील रहिवासी असलेले २ कोविड – १९ बाधीत रुग्ण वायसीएम रुग्णालयात दाखल होते. यांची दोन्ही वेळची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button