breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीराष्ट्रिय

8 वर्षांपेक्षा जुन्या वाहनाचा भरावा लागणार ‘ग्रीन टॅक्स’, गडकरींची प्रस्तावाला मंजूरी

नवी दिल्ली : 8 वर्षांपेक्षा जुने आणि प्रदुषण करणाऱ्या वाहनांकडून ग्रीन टॅक्स आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूरी दिली आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकार जुन्या प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर हा कर लावण्याचा विचार करत आहे.

हा प्रस्ताव आता औपचारिकरित्या अधिसूचित होण्यापूर्वी सल्लामसलत करण्यासाठी राज्यांकडे जाणार आहे. हा कर 1 एप्रील 2022 पासून अंमलात येणार आहे. तसेच, 15 वर्षांपेक्षा जुन्या सर्व सरकारी वाहनांची नोंदणी देखील रद्द केली जाईल.

फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरणाच्या वेळी रस्ता कराच्या 10 ते 25% दराने 8 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वाहनांवर ग्रीन टॅक्स आकारला जाऊ शकतो. हायब्रिड, इलेक्ट्रिक व्हेईकल्स आणि अल्टरनेट फ्यूल व्हेईकल्स जसं की सीएनजी, इथेनॉल, एलपीजी अशा इंधनांवर चालणाऱ्या गाड्यांवर हा टॅक्स लावला जाणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button