breaking-newsराष्ट्रिय

नव्या वर्षाचे स्वागत करताना केलेल्या गोळीबारात लहान मुलाचा मृत्यू

राजधानी दिल्लीतील उस्मानपूर भागात नव्या वर्षाचे स्वागत करताना एकाने गोळीबार केला. या गोळीबारात एका दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर दिल्लीतील वेलकम भागात जल्लोष करताना केलेल्या गोळीबारात एक मुलगा जखमी झाला आहे.

ANI

@ANI

Delhi: A 10-year-old died after being hit by a bullet during new year celebrations in Usmanpur yesterday, another minor was injured after being shot at during celebrations in Welcome area. Two people detained in the first incident

५३ लोक याविषयी बोलत आहेत

सुत्रांच्या माहितीनुसार, सुमारे १८ जण नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी एका ठिकाणी जमा झाले होते. यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता. दरम्यान, एकाने मजेसाठी हवेत गोळीबार केला. मात्र, बंदुकीतून सुटलेली एक गोळी एका १० वर्षांच्या मुलाला लागली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचबरोबर देशभरातील विविध भागातही अशा घटना घडल्या आहेत. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये नववर्षानिमित्त पिकनिकला गेलेल्यांपैकी दामोदर नदीत पाच जण बुडाल्याची घटना समोर आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button