breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटाच्या नावावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप…

आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाच्या पोस्टर पासून ते आता नावापर्यंत अडचणींमध्ये वाढ झाली आहे. ब्राह्मण महासंघाने या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेत चित्रपटाच्या नावात बदल करण्याची मागणी केली आहे. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी ही मागणी केली आहे. सविता भाभी या कॉमिक कॅरेक्टरवरुन वाद सुरु असतानाच आता चित्रपटाच्या नावावरुन नवा वाद सुरु झाला आहे. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

“अश्लील हा शब्द जरी मराठी भाषेत असला तरीदेखील तो उघडपणे आपण उच्चारत नाही. मात्र या चित्रपटाच्या नावातच अश्लील हा शब्द आहे. थोडक्यात, या नावावरुन चित्रपटात काहीतरी अश्लील दाखविण्यात येईल, असं प्रेक्षकांना भासवण्यात येत आहे. तसंच या नावामुळे लोकांची लैंगिक भूक चाळावली जाते. त्यामुळे लोकांमधील विकृतीही वाढताना दिसत आहे”, असं आनंद दवे यांनी सांगितलं

पुढे ते म्हणतात, “चित्रपटाचं नाव पाहिल्यानंतर आम्ही निर्मात्यांना फोन करुन नाव बदल्याची मागणी केली. मात्र प्रदर्शनाची तारीख जवळ आल्यामुळे नावात बदल करणं शक्य नसल्याचं निर्मात्यांनी सांगितलं. मात्र आम्ही आमचा विरोध कायम ठेवणार आहोत”.

नाव न बदलल्यास ब्राह्मण महासंघाने त्यांची भुमिका काय असेन हे स्पष्ट केलं आहे…
“आमचा विरोध हा कायम राहिलं. ज्याला हा चित्रपट पाहायचा आहे त्यांनी तो पाहावा. मात्र आम्ही या चित्रपटाला कायम विरोध करु. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका, नाव बदलण्यामागचं कारण आम्ही लोकांना सांगू. तसंच अशा प्रकारचे चित्रपट पाहू नये असं आवाहनही करु”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button