breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘नोटाबंदीवेळी हवाई दलाने 625 टन नव्या नोटा पोहोचविल्या’- बी.एस.धनोवा

मुंबई | महाईन्यूज

हवाई दलाने नोटाबंदीनंतर देशातील विविध भागात 625 टन नवीन नोटा पोहोचविण्याचे काम केल्याचे हवाई दलाचे माजी एअर मार्शल बी.एस.धनोवा यांनी सांगितले आहे. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मुंबई येथे आयोजित टेकफेस्ट कार्यक्रमात बी.एस.धनोवा यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर, 2016 मध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता.

बी.एस.धनोवा यांनी सांगितले की, ‘ज्यावेळी नोटाबंदी झाली होती, त्यावेळी आपल्यापर्यंत नव्या नोटा पोहोचविण्याचे काम केले होते. जर 20 किलोग्रॅमच्या बॅगेत एक कोटी रुपये येतात, तर मी सांगू शकत नाही की किती कोटी रुपये आम्ही पोहोचविले.’ बी.एस.धनोवा यांच्या प्रेझेंटेशनच्या एका स्लाइडमध्ये असे दाखविण्यात आले की, नोटाबंदीच्या घोषणेनंतर देशाच्या सेवेसाठी हवाई दलाने 33 मोहिमांद्वारे 625 टन नोटा विविध भागात पोहोचविलेल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button