breaking-newsराष्ट्रिय

आजारी पर्रिकर नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी सचिवालयात दाखल

आजारी असतानाही गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सचिवालयात हजेरी लावली. सुमारे साडेतीन महिन्यांच्या दीर्घ काळानंतर पर्रिकर यांनी आज (दि.१) आपल्या कार्यालयात दाखल झाले आहेत. यावेळी भाजपा कार्यकर्ते, नेते आणि सचिवालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Panaji: Goa Chief Minister Manohar Parrikar arrives at the state secretariat, is welcomed by party workers and leaders. Parrikar is being treated since February last year for a pancreatic ailment

९३ लोक याविषयी बोलत आहेत

सप्टेंबरच्या सुरुवातीला पर्रिकर शेवटचे आपल्या कार्यालयात आले होते. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा येथे हजेरी लावली. पर्रिकर आजारी असतानाही भाजपा पक्षश्रेष्ठी त्यांच्याकडून काम करुन घेत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील काही नेत्यांनी केला होता. दरम्यान, ते स्वतःहून विविध प्रकल्पांना भेटी देत असल्याचे माध्यमांतून समोर आले होते. नुकतेच त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह एका सिंचन प्रकल्पाची पाहणी करीत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Goa: Chief Minister Manohar Parrikar held meeting with his cabinet colleagues and officials at the state secretariat in Porvorim.

८१ लोक याविषयी बोलत आहेत

सुमारे वर्षभरापासून पर्रिकर स्वादूपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. या आजारावर त्यांनी सुरुवातीला मुंबईतील लीलावती रुग्णालय त्यानंतर दोनदा अमेरिकेत जाऊन उपचार घेतले. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली असली तरी अद्याप प्रकृती खालावल्याचे त्यांच्या ताज्या छायाचित्रांवरुन कळते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button