breaking-newsराष्ट्रिय

#CoronaVirus: दहशत! चीनहून परतलेली विद्यार्थिनी थेट पोहोचली रुग्णालयात; डॉक्टरांनी खुर्ची सोडून ठोकली धूम

नवी दिल्ली | महाईन्यूज

कोरोना व्हायरसनं हळूहळू पूर्ण जगाला विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. या विषाणूनं जगभरात धुमाकूळ घातला असून, आतापर्यंत पाच हजारांहून अधिक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. भारतातही या रुग्णांची संख्या शंभरी पार गेली आहे. तसेच देशात कोरोनानं दोन जणांचा मृत्यूही झाला आहे. कोरोनाचं नाव ऐकल्यावरच लोकांचा थरकाप उडत आहे. उत्तर प्रदेशमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशमधल्या संतकबीरनगरमधल्या रुग्णालयात सर्दी आणि खोकला झालेली विद्यार्थिनी आल्यानंतर डॉक्टरांनी खुर्ची सोडूनच पळ काढला आहे.

खरं तर तीन फेब्रुवारीला एक विद्यार्थिनी चीनहून परतली होती. जिथे कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. विद्यार्थिनीला परतल्यानंतर 28 दिवसांसाठी डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं होतं. त्यानंतर तिला कोरोना व्हायरसचं संक्रमण नसल्याचं समोर आलं. काही दिवसांनंतर साधारण सर्दी आणि खोकल्यावरचे उपचार घेण्यासाठी ती जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. तिनं चीनहून एमबीबीएसचा अभ्यास करून परतल्याचं सांगितल्यानंतर डॉक्टरांनी थेट खुर्ची सोडूनच धूम ठोकली. रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी याची सूचना रॅपिड रिस्पॉन्स टीमला दिली. त्यानंतर टीमनं तात्काळ घरी पोहोचून विद्यार्थिनीची तपासणी केली, तेव्हा तिच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत. तरुणीनं सांगितलं की, डॉक्टरला चीनहून परतल्याचं सांगितल्यानंतर तो खुर्ची सोडून पळून गेला. तसेच जिल्ह्याचे सीएमओ हरगोविद सिंह यांनी सांगितलं की, जेसुद्धा लोक परदेशातून परतलेले आहेत, त्यांना 28 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात आलेलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button