breaking-newsआंतरराष्टीय

सासरी अपमान झाल्याने जावयाने पोटच्या मुलांसह सहा जणांना केले ठार

सासरी अपमान झाल्याने भडकलेल्या एका व्यक्तीने आपल्या मुलांसह कुटुंबातील ६ जणांची हत्या करून स्वत:वरही गोळी झाडली. ही घटना थायलंड येथे घडली. सुशीप सोर्संग असे व्यक्तीचे नाव आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सुरू असलेल्या सोहळ्यादरम्यान सुशीपने हे कृत्य केले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

विविध माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, सुशीपच्या पत्नीच्या माहेरी नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सुशीप या पार्टीत सहभागी होण्यासाठी तिथे गेला होता. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा सुशीप नशेत होता.

पोलीस अधिकारी लेफ्टनंट कर्नल लार्प कंपपन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृत हे एका कुटुंबातील आहेत. मृतात सुशीपचा ९ वर्षांचा मुलगा आणि ६ वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. जावई असूनही पत्नीच्या नातेवाईकांनी आपले स्वागत केले नाही, यामुळे तो चिडला होता. रागाच्या भरातच त्याने ६ जणांची गोळ्या झाडून हत्या केली नंतर स्वत:वरही गोळी झाडली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button