TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

नवरदेवाकडून आधी लोकशाहीचे कर्तव्य, त्यानंतर लग्न

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील नवरदेवाने आधी लोकशाहीचे कर्तव्य पार पाडत चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा हक्क बजावत तरूणांसमोर एक आदर्श उभा केला आहे. जुनी सांगवी येथील संगमनगर भागातील प्रेम राजकुमार कांबळे युवकाचे आज लग्न होते.
लग्नाला जाण्याआधी मुंडावळ्या,फेटा पोशाख परिधान केलेल्या स्थितीत आधी कर्तव्य लोकशाहीचे असे म्हणत सह कुटुंब सहपरिवार येथील नॅशनल स्कूल बुथ क्रं.४९८ येथे येवून मतदानाचा हक्क बजावला. जुनी सांगवी बुद्धघोष सोसायटी येथील राजकुमार व माधुरी कांबळे यांचा मुलगा प्रेम कांबळे याचे मतदान दिनाच्या दिवशी नर्हे येथे लग्न होते.
लग्नाला जाण्याआधी सांगवी येथे मतदान करत देशाच्या लोकशाही हक्काचा व राष्ट्र कर्तव्य आधी सांगत मतदान करून बोहल्यावर जाण्यास प्राधान्य दिले. जुनी सांगवी येथील छायाचित्रकार राजकुमार कांबळे यांच्या मोठ्या मुलाचे रविवारी दि.२६ रोजी दुपारी एक वाजता पुण्यातील नर्हे येथील मधुरा या वधुशी लग्न होते.
चिंचवड विधानसभा पोट निवडणूक अचानक लागल्याने लग्नाच्याच दिवशी मतदान असल्याने व सांगवी पिंपरी चिंचवड परिसरापासून सिंहगड रोड येथील नर्हे येथील ठिकाणी लांब अंतरावर लग्न असतानाही व लग्नाला उशीर होत असला तरी लग्नाचे वऱ्हाडी व लग्न समारंभास उपस्थित पाहुणे व नातलग यांना आधी मतदानाचा हक्क नंतर मी लग्नाला येतो.
असे सांगत जुनी सांगवी येथील नॅशनल स्कुल येथील मतदान केंद्रावर प्रेम कांबळे या नवरदेवाने कळवून राष्ट्र कर्तव्य व आपला मतदानाचा मूलभूत अधिकार प्रथम देत एक वेगळ्या स्वरूपाचे उदाहरण नागरिकांसमोर उभे केले आहे.
यावेळी प्रेम कांबळे, वडील राजकुमार कांबळे, आजी नलिनी शिंदे, भाऊ रणजित कांबळे, सामाजिक कार्यकर्ते राजू सावळे उपस्थित होते. यामुळे परिसरातून नवरदेव व कुटुंबियांचे कौतुक होत आहे.मतदान कर्मचारी,पोलिस बांधवांनी त्याच्या या कामगिरीचे शुभेच्छा देवून कौतुक केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button