breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

“केजरीवालांना खोकला, उद्धव ठाकरेंना..”; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

शरद पवार महाराष्ट्रातील राजकारणाचे बिनचिपळीचे नारद

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

बाळासाहेब ठाकरेंनी शरद पवारांशी मैत्री जपली. बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मातोश्रीवर नेऊन मासे खाऊ घालायचे. पण, शिवसेना भवनात कधी चहा पाजला नाही. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लालसेत आले. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी खोट्या शपथा घेतल्या, की मला अमित शहांनी वचन दिलं होतं, असं प्रकाश महाजन म्हणाले.

एका मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही एवढं खाली पडू शकता. मुख्यमंत्रीपदावर असतानाही फार मोठं दिवे लावले. हे मुख्यमंत्री असताना पालघरला साधूंना ठेचून मारलं. केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. केजरीवालांना खोकला, उद्धव ठाकरेंना मनक्याचा आजार आणि दोघांचा डॉक्टर एकच, नरेंद्र मोदी, असा टोला प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी सोयरिक केली. लोकं मातोश्रीवर पाठिंबा मागवण्यासाठी यायचे, हे मातोश्रीच्या बाहेर गेले. शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकारणाचे बिनचिपळीचे नारद आहेत. ही पदवी केशवराव धोंडगे यांनी शरद पवारांना दिली. शिवसेना संपण्याचा चंगच यांनी बांधला, असंही प्रकाश महाजन म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button