ताज्या घडामोडीमुंबई

मुंबईसह राज्यातील १४ महापालिकांची आज आरक्षण सोडत, राजकीय कारकिर्दीचे भविष्य ठरवणार

मुंबई |मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात आज, मंगळवारी वाढीव नऊ प्रभागांसह एकूण २३६ प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी ११ वाजता सोडतीचे आयोजन केले आहे. ही सोडत काढताना गेल्या तीन निवडणुकांत सलग दोन वेळेस पुरुष किंवा महिला आरक्षण असलेल्या प्रभागांतील आरक्षण यंदा बदलले जाईल. या आरक्षण सोडतीवर सर्वच राजकीय पक्ष, नेते, नगरसेवकपदाच्या शर्यतीत असलेल्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

मुंबई पालिकेकडून मंगळवारी २३६ प्रभागांसाठी आरक्षण सोडती निघणार आहे. त्याविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीविषयी प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ महापालिकांना ३१ मेपर्यंत आरक्षण सोडत जाहीर करण्याचा आदेश दिला होता. ही सोडत शालेय विद्यार्थ्यांचा हस्ते काढली जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांकडून आरक्षणाच्या चिठ्ठ्या उचलण्यात येणार आहेत. सर्वप्रथम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व त्यानंतर महिला आरक्षणासाठी सोडत काढली जाणार आहे. मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत कार्यक्रम पार पडेल.

आरक्षण सोडत प्रक्रिया

मंगळवारी काढण्यात येणाऱ्या आरक्षणावर १३ जूनला शिक्कामोर्तब होणार आहे. २०१७मध्ये महापालिकेचे २२७ प्रभाग होते. लोकसंख्येत वाढ झाल्याने राज्य सरकारने त्यात नऊ प्रभागांची वाढ केल्याने ही संख्या २३६ इतकी झाली आहे. आरक्षण सोडतीत अनुसूचित जातीच्या १५, अनुसूचित जमातीच्या व महिला आरक्षित प्रभागांची सोडत काढली जाईल. शेवटी उर्वरित प्रभागांमधून १०९ महिला आरक्षित प्रभागांची सोडत काढली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या निवडणूक विभागाकडून देण्यात आली.

अशी निघणार सोडत

आरक्षित प्रभागांच्या सोडतीनंतर त्यावर ६ जूनपर्यंत सूचना, हरकती मागवण्यात येतील आणि त्यानंतर १३ जून रोजी अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर २३६ प्रभाग, बुथनुसार मतदार याद्या तयार केल्या जातील. त्यासाठी सुमारे एक ते दीड महिन्याचा कालावधी लागण्याची अपेक्षा आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑगस्टपर्यंत पूर्ण होऊ शकते. त्याचवेळी सप्टेंबरपर्यंत पावसाळा असल्याने सुरुवातीला निवडणूक तारीख जाहीर केली जाईल. त्यानंतर ४५ दिवसांची आचारसंहिता असल्याने पालिका निवडणूक ऑक्टोबरमध्ये पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अशा आहेत जागा

मुंबई पालिका एकूण प्रभाग : २३६

महिला : ११८

अनुसूचित जाती : १५

अनुसूचित जमाती : २

खुला वर्ग महिला : १०९

अनुसूचित जाती महिला : ८

अनुसूचित जमाती महिला : १

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button