breaking-newsपुणे

दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे जगणे निरचक्राच्या सहाय्याने सुकर झाले

  • ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनचा विधायक उपक्रम
  • जिल्ह्यातील ७६ आदिवासी कुटुंबांना ३५ निरचक्रांचे वाटप

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

एकीकडे संपूर्ण जग कोविड -१९ च्या जागतिक साथीच्या आजाराचा सामना करीत असताना, दुर्गम आणि ग्रामीण भागातील लोक पूर्वीपासूनच अस्तित्त्वात असलेल्या पाणी आणण्याच्या जागतिक समस्येचा सामना करीत आहे. आजही लाखो आदिवासी कुटुंब एकाच वेळी कोरोना आणि पाणी या दोन्ही समस्यांचा सामना करीत आहेत. मात्र ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या निरचक्रामुळे दुर्गम भागातील नागरिकांच्या पाणी वाहतुकीचे ओझे आता हलके होत आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील वरोती बुद्रुक आणि ढोपेखिंड गावामधील ७६ आदिवासी कुटुंबांना ३५ निरचक्रांचे वाटप करण्यात आले.

यावेळी ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनचे संस्थापक तन्वीर इनामदार, सहसंचालक तमन्ना इनामदार, ग्रामसेविका कल्पना शिळीमकर, ग्रामसेवक दिलीप शिळीमकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनच्या मिशन परिवर्तनद्वारे  गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील दुर्गम गावांतील २०० हून अधिक कुटुंबाचा ओझे कमी केले आहे. निरचक्र हे असे यंत्र आहे कि ज्याद्वारे पाण्याची ने-आण अगदी सोप्या पद्धतीने करता येते. गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतांवर आधारित हि वाहतूक गाडी आहे, ज्यामध्ये एक ८० लिटर पाण्याचा पिंप बसवण्यात आला आहे. रस्त्यातील खड्डे अथवा चढ उतार किंवा इतर अडथळा आला तरी यामध्ये भरलेल्या पाण्याची हेळसांड न होता अगदी सहजरित्या पाण्याची वाहतूक करता येते.

वृद्ध असो किंवा लहान मुले हे देखील या निरचक्र वाहनाद्वारे ८० लिटर पाणी वाहतूक करू शकतात तेही केवळ ५ तर ७ किलो एवढ्या वजनाची टाकत वापरून. पर्सिस्टंट फाऊंडेशनच्या बहुमूल्य पाठबळावर आणि समन्वयाने आम्ही वेल्हे तालुक्यातून मिशन परिवर्तन – नीरचक्र हा प्रवास पुन्हा सुरू केला आहे. दोन्ही फाउंडेशनच्या वतीनेआतापर्यंत ४५० हुन अधिक आदिवासी कुटुंबांचा विकास होत आहे. शासनाच्या कोविड १९ च्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून या निरचक्रांचे वाटप करण्यात येत आहे.  २०२१ च्या अखरेपर्यंत महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यातील २०० गावांमधील ७००० कुटुंबांपर्यंत मिशन परिवर्तन- निरचक्र पोहचवण्याचा मानस तन्वीर इनामदार यांनी यावेळी व्यक्त केला. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button