breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘भाजपात आजपर्यंत कधीच फूट पडली नाही कारण..’; देवेंद्र फडणवीसांचा सूचक विधान

मुंबई | भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर पक्षांमधील फुटीबाबत भाष्य केलं आहे. तसेच स्वपक्षाचं कौतुक केलं. भाजपा जगातील सर्वांत मोठा पक्ष असल्याचा दावा त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपा आज जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. जगात सर्वाधिक सदस्य भाजपाचे आहेत. भारतात सर्वाधिक खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य, महपौर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य भाजपाचे आहेत. देशाच्या इतिहासात एकच असा राष्ट्रीय पक्ष आहे ज्यात कधीच उभी फूट पडली नाही. देशातल्या प्रत्येक पक्षात कधी ना कधी फूट पडली. काँग्रेसच्या तर इतक्या काँग्रेस झाल्या की त्या आता मोजता येणार नाहीत. कम्युनिस्ट पक्षात फूट पडली.

हेही वाचा      –     दोन दिवस होरपळीचे! विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा 

समाजवादी पक्षाची तर एवढी शकलं पडली की मोजायला बसलो तर वेळ कमी पडेल. पण भाजपा एकमेव असा पक्ष आहे की पहिल्यापासून आजपर्यंत या पक्षात कधीच फूट पडली नाही. हा पक्ष एकसंघ राहिला. भारतीय जनता पक्षात फूट पडली नाही याचं एकमेव कारण म्हणजे या पक्षाचे नेते कधी आत्मकेंद्री नव्हते. ते कधी स्वार्थी नव्हते. या पक्षाचे कार्यकर्ते कधी स्वार्थी नव्हते. हा पक्ष कुणालातरी पंतप्रधान बनवण्यासाठी, कुणाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी, कुणालातरी सत्तेची खुर्ची देण्यासाठी तयार करण्यात आलेला नाही. एका विचारासाठी हा पक्ष तयार करण्यात आला, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button