breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला शिवसेना दांडी मारणार ?

मुंबई | महाईन्यूज

मुख्यमंत्रिपदावरून निर्मण झालेल्या वादानंतर शिवसेना आणि भाजपात फुट पडली. अधिकृत घोषणा झाली नसली तरी शिवसेना ही भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडल्यात जमा आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावण्यात आलेल्या एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीला शिवसेना अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनासंदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भाजपाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी एनडीएच्या घटकपक्षांची बैठक रविवारी संध्याकाळी बोलावण्यात आली आहे. मात्र राज्यात सत्तास्थापनेवरून झालेल्या वादानंतर शिवसेना भाजपापासून दुरावली असून, त्यामुळेच एनडीच्या या बैठकीला शिवसेना अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

मात्र शिवसेनेशी असलेले संबंध बिघडल्यानंतर शिवसेनेला एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना आणि एनडीए यांच्यातील संबंध सध्यातरी संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button