breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

…तर मी सॉरी बोलतो; सुप्रिया सुळेंबाबतच्या ‘त्या’ विधानावर अब्दुल सत्तारांचा माफीनामा

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. ज्यावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सत्तारांनी सुप्रिया सुळेंबाबत वापरलेल्या अपशब्दांवर आता सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही चांगलचे आक्रमक झाले आहेत. सत्तारांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर तसेच राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते घोषणाबाजी देत आंदोलन करत आहेत. ठिकठिकाणी सत्तारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत आणि त्यांच्या फोटोंना काळं फासत जोडे मारो आंदोलन करण्यात आले. अशा परिस्थितीत सत्तारांनी महाराष्ट्रातील कोणत्याही महिलेचं यामुळे मनं दुखवलं असेल तर मी सॉरी बोलतो म्हणत माफी मागितली आहे.

सत्तार म्हणाले की, मी कोणत्याच महिलेविरोधात अपशब्द बोललो नाही. आणि मी जे बोलले ते आम्हाला बदनाम करत आहेत त्यांच्याबद्दल बोललो. सुप्रिया सुळे.. किंवा कोणत्याही महिलेचं मनं दुखवेल असा कोणताही शब्द मी बोललो नाही, जर कोणत्या महिलांना वाटत असेल मी आक्षेपार्ह बोललो, आणि त्यांची मनं दुखावली तर मी जरूर खेद व्यक्त करतो. पण मी असं काही बोललो नाही, जे खोक्यांचा आरोप करत आहेत त्यांनी मी बोललो, मात्र माझ्या बोलण्याचा अर्थ महिलांबाबत काढत आहेत. आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि आमदार महिलांचा सन्मान करतात आणि मीही महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे. असे म्हणत सत्तारांनी माघार घेतली. मात्र, त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. सत्तारांनी केवळ माफी न मागता त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button