breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिल्लीतील स्मार्ट सिटीच्या उपसंचालकाची पिंपरी-चिंचवड शहराला भेट

पिंपरी, (महाईन्यूज) – केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर सुरू असलेल्या प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी दिल्लीतील स्मार्ट सिटी योजनेचे उपसचिव संजय शर्मा यांनी महापालिकेला भेट दिली. शहरातील एबीडी एरिया बायसिकल शेअरिंग, ई बाईक, स्टिअर स्केपींग, रोड प्रकल्पांची त्यांनी पाहणी केली.

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव भागांत स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामे जोरात सुरू आहेत. अरिया बेस्ड डेव्हपमेंट अंतर्गत विकास प्रकल्प सुरू आहेत. ई बाईक, ई स्कूटर, सायकल शेअरिंग अशी सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. पर्यावरण संवर्धन आणि प्रदुषण कमी करण्यावर भर दिला जात आहे. या कामांची पाहणी करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेचे दिल्लीतील उपसचिव संजय शर्मा यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला आज रविवारी आवरजून भेट दिली.

उपसचिव शर्मा यांनी पिंपळे सौदागर येथील ई बाईक, ई स्कूटर शेअरिंगची माहिती घेतली. एबीडी कामांची पाहणी केली. पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील सौर पॅनलची पाहणी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button