breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

विश्वचषक अंतिम सामना, इंग्लंडसमोर २४२ धावांचे आव्हान

क्रीडा वृत्त –  इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना होत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने ५० षटकात ८ बाद २४१ धावा केल्या. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांच्या माऱ्यापुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांना फारसे हात मोकळे करता आले नाहीत.

सलामीवीर निकोल्सचे केलेले अर्धशतक (५५) आणि टॉम लॅथमच्या झुंजार ४७ धावा यांच्या बळावर न्यूझीलंडने इंग्लंडला २४२ धावांचे आव्हान दिले. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट यांनी प्रत्येकी ३-३ बळी टिपले.

न्यूझीलंडने उपांत्य सामन्यात भारताला धूळ चारली. तर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत मात दिली. त्यामुळे या दोघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. या दोनही संघांकडे आतापर्यंत एकही विश्वचषक विजेतेपद नाही, त्यामुळे आज सामन्याचा निकाल आल्यानंतर क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button