breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

हवाई दलाला मिळणार राफेलचं बळ; आणखी १६ विमानं होणार दाखल

भारताने फ्रान्सला ३६ राफेल विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यातील पाच विमाने २९ जुलै रोजी अंबाला एअरबेसवर दाखल झाली. १० सप्टेंबरला राफेल विमाने औपचारिकरित्या समारंभपूर्वक इंडियन एअर फोर्सचा भाग झाली. दरम्यान, आता भारतीय हवाई दलाची क्षमता आणि ताकद आणखी वाढणार आहे. १६ Omni- role राफेल जेट लढाऊ विमानं एप्रिल २०२१ पर्यंत भारतीय हवाई दलात सामील होणार आहेत. भारतातही जेट इंजिन आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या साधनसामग्रीची निर्मिती करण्याचं काम सुरू करणार असल्याची माहिती फ्रान्सची सर्वात मोठी जेट इंजिन तयार करणारी कंपनी सफरानकडून देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button