breaking-news

#CoronoVirus:संगमनेरमध्ये एकाच दिवसात 7 कोरोना रुग्ण, नगरमधील बाधितांची संख्या 51 वर

अहमदनगर : जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात शुक्रवारी (8 मे) एकाच दिवसात 7 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत . त्यामुळे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या अहमदनगरची वाटचाल पुन्हा कोरोना हॉटस्पॉटकडे होते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. या नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील जवळपास 70 हजार नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. नव्याने नोंद 7 कोरोना रुग्णांची नोंद झाल्यानंतर आता जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 51 वर पोहोचली आहे.

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे एका 68 वर्षीय व्यक्ती आजारपणामुळे रुग्णालयात दाखल झाला. त्यावेळी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना रुग्णाच्या अहवालावरुन संशय आल्याने त्यांनी त्याचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवले. मात्र, रुग्णाच्या नातेवाईकांनी संबंधित चाचणीचे अहवाल येण्याआधीच रुग्णाला घरी नेले. मात्र, घरी गेल्यानंतर या रुग्णाचा मृत्यू झाला. यानंतर तातडीने या रुग्णाचा कोरोना अहवाल मागवण्यात आला असता तो रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे जिल्हा यंत्रणेने सतर्क होत कठोर पावले उचलली आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. या गावातील एकूण 6 जण कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झालं. याच पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि पोलीस अधिक्षक अखिलेश सिंग यांनी धांदरफळ गावाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच मृत रुग्ण उपचारासाठी ज्या खासगी रुग्णालयात दाखल होता तेथेही भेट देत माहिती घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button