breaking-newsराष्ट्रिय

दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात केलं दाखल

नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावली आहे. मंगळवारी त्यांना दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सत्येंद्र जैन यांना श्वास घेण्यात त्रास होत होता.

सत्येंद्र जैन यांची कोरोना विषाणूची चाचणीही झाली आहे. त्यांच्या चाचणीचा अहवाल लवकरच येईल. त्यांना सध्या रूग्णालयात ऑक्सिजनच्या  आधारावर अॅडमिट करण्यात आलं आहे.

स्वत: सत्येंद्र जैन यांनीही ट्विटद्वारे ही माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, तीव्र ताप आणि श्वासोच्छवासाच्या त्रासानंतर मला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मी तुम्हाला माहिती देत राहिल.

विशेष म्हणजे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन सतत बैठकामध्ये ही सहभागी होत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर अधिकाऱ्यांच्या बोलावलेल्या बैठकीत ही सत्येंद्र जैन आरोग्यमंत्री म्हणून उपस्थित होते.

यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यांना ताप आणि खोकला याची समस्या होती. पण त्यांची कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आली. अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा काम सुरू केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button