breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘खतरों के खिलाडी’मधील स्पर्धक अनुष्का सेनला कोरोना

केपटाउन – टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो ‘खतरों के खिलाडी’चा अकरावा सिझन चांगलाच चर्चेत आहे. या शोसंबंधीत वेगवेगळ्या घडामोडी रोज समोर येत आहेत. आता शोमधील स्पर्धक अनुष्का सेन हिला कोरोनाची लागण झाली आहे. अनुष्काला कोरोनाची कोणतीही लक्षणे नसली तरी तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तिला क्वारंटाईन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासूनच केपटाउनमध्ये ‘खतरों के खिलाडी’ शोच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या शोमध्ये टेलिव्हजनवरील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे. यात अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी, श्वेता तिवारी, राहुल वैद्य, वरुण सूद,अभिनव शुक्ला, सौरभ राज जैन आणि निक्की तांबोळी अशा अनेकांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वीच कलर्स वाहिनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या शोचा एक प्रोमो शेअर करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये एका जीपमध्ये रोहित शेट्टी बसताना दिसतोय आणि त्याच्या शेजारीच एक चित्ता बसलेला पाहायला मिळतोय. हा थरारक प्रोमो पाहूनच प्रेक्षकांमध्ये शओबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्काची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्व स्पर्धक आणि शोसंबंधित सर्व क्रू मेंबर्सची कोरोना चाचणी करण्यात आली असून सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button